ब्रेकिंग न्यूज | आंतरराष्ट्रीय घडामोड
“ही दोस्ती तुटायची नाय – रशिया आणि भारत”
जागतिक स्तरावर युद्धसदृश परिस्थिती आणि आखाती देशांमधील अस्थिरतेमुळे तेलपुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अशा संकटाच्या काळात रशियाने भारताशी असलेली मैत्री जपली असून, खंडित झालेला तेलपुरवठा सुरळीत करण्यासाठी भारताला थेट तेलपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आखाती देशांमधून होणारा पुरवठा अडकल्याने भारतासमोर इंधनटंचाईचा धोका निर्माण झाला होता. मात्र रशियाने पुढाकार घेत भारताला आवश्यक त्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा चालू ठेवला आहे. यामुळे भारतातील पेट्रोलियम साठा स्थिर राहण्यास मदत झाली असून, दरवाढीचा धोका काही अंशी टळला आहे.
विश्लेषकांच्या मते, हा निर्णय केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून भारत–रशिया यांच्यातील दीर्घकालीन मैत्री आणि विश्वासाचे प्रतीक आहे. आंतरराष्ट्रीय दबाव आणि राजकीय समीकरणांमध्येही रशियाने भारताच्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.
या घडामोडीमुळे भारताला दिलासा मिळाला असून, जागतिक बाजारातील अस्थिरतेतही भारताची ऊर्जा गरज सुरक्षित राहण्याची शक्यता वाढली आहे.
अश्याच महत्त्वाच्या बातम्या, क्रिकेट स्कोअर आणि जाहिरातीसाठी Follow करा :
📷 Instagram
📘 Facebook
▶️ YouTube
🌐 www.ramdutnews.in
राजू जाधव
मुख्य संपादक
रामदूत न्यूज




